दरवर्षी जागतिक हॅम रेडिओ दिवस 18 एप्रिलला पुण्यात व जगभर साजरा केला
जातो. या वर्षीही तो पुण्यात भव्यतेने आकाशवाणी पुणे केंद्राच्या शिवाजी नगर येथील सभागृहात सायंकाळी ४:०० ते ६:३० या वेळात साजरा झाला.
या कार्यक्रमात् श्री विश्वास काळे, संचालक विजयेश इन्स्ट्रुमेंट्स पुणे यांचे “सर्वांसाठी सुरक्षितता” विषयावर उद्बोधक व शास्त्रीय मुख्य भाषण झाले
श्री अधीर गडपाले, उपमहानिदेशक, केंद्र प्रमुख, आकाशवाणी पुणे व श्री इंद्रजित बागल, सहायक निदेशक, कार्यक्रम प्रमुख, आकाशवाणी पुणे यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली
हॅम रेडिओ हा एक जागतीक व शास्त्रीय छंद आहे .जगातील लाखो लोक दररोज एकमेकांच्या संपर्कात हॅम रॅडिओद्वारे असतात व निरनिराळ्या प्रकल्पांची व प्रयोगांच्या माहितीची देवाण घेवाण करतात.
हॅम नी संकट काळात रेडिओ संपर्काद्वारे मदत केल्याची अनेक उदाहरणे सर्वश्रुत आहेत. नुकताच तुर्कस्तानात जो विनाशी भूकंप झाला त्या काळात सर्व संदेश यंत्रणा बंद पडल्यावर त्या सुरु होपर्यंत हॅम्स नी अत्यंत महत्वाची संदेश वहनाची कामगिरी बजावली व हजारो लोकांचे प्राण वाचविले
या शाश्त्रीय छंदात जगभर चिमुरड्या मुला पासून ते आजोबांपर्यंत सर्व वयाचे स्त्री पुरुष सहभागी असतात. या छंदामुळे कौशल्य विकासा बरोबर सखोल शास्त्रीय ज्ञान प्राप्त होण्यास मदत होते.
भारतात या छंदाचा प्रसार सर्व स्तरात झपाट्याने होत आहे.
हा छंद करणाऱ्याला” हॅम” अथवा ऍमेचुर रेडिओ ऑपरेटर असे जगभर संबोधले जाते
हॅम ची संख्या जितकी जास्त तितकी त्या देशाची तंत्रज्ञानात प्रगती जास्त अशी फुटपट्टी जगभर लावली जाते.
दिनांक १८ एप्रिल रोजी झालेल्या अडीच तासाच्या कार्याक्रमात श्री विलास रबडे यांनी,
मेक इन इंडिया व कौशल्य विकास अंतर्गत शाळा व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या सहभागावर या कार्यक्रमात भर दिला.कार्यक्रमाला सुमारे 50 शाळकरी विद्यार्थी उपस्थित होते .
प्रत्येक विद्यालय व महाविद्यालयात हॅम रेडिओ क्लब व 24 तास सुरु असणारी प्रयोगशाळा सुरु करण्यावर स्वतंत्र मार्गदर्शन करण्याचे आश्वासन पुणे हॅम्सच्या वतीने दिले.
CBSE चा ९ वीच्या अभ्यासक्रमात हॅम रेडिओ चा समावेश केला आहे
हॅम सूरज शेनॉयVU3ZAG याने घरी बनविलेल्या हॅम रेडिओचे (SDR) प्रात्यक्षिक उपस्थिताना दाखविले
रेडीओ वर आधारित प्रश्न मंजुशेचा कार्यक्रम लायन सतीश राजहंस (माजी तंत्रज्ञ आकाशवाणी पुणे )यांच्या मार्गदर्शनाखाली सौ दिपाली अकोलकर व सौ रेश्मा पवार यांनी बहारदारपणे आयोजित केला व सर्व विजेत्यांना बक्षिसे दिली.
हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्र, टेक फोरम, व पुणे हॅम VU2RCP यांच्या संयुक्त विद्यमाने साकार झाला
धन्यवाद
विलास पुणे
पुणे हॅम्स व टेक फोरम
VU2VPR
9822502078









